---Advertisement---

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निकम यांच्या वाढदिनी अक्कलकोटमध्ये उद्या रक्तदान शिबिर

On: December 18, 2020 11:44 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद सप्ताह अंतर्गत उद्या दि. १९ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अक्कलकोट शहराध्यक्ष मनोज निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाने या सप्ताहचा समारोप कार्यक्रम आयोजित केला आहे. सध्या राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम आयोजित केला आहे.

या शिबिराचे उदघाट्न राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश  पाटील,सोलापूर शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले हे राहणार आहेत.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप भाऊ सिध्दे, जिल्हा उपाध्यक्ष महेश  माने यांची उपस्थिती राहणार आहे.हा कार्यक्रम सर्जेराव जाधव सभागृह, फत्तेसिंह चौक अक्कलकोट येथे सकाळी ९ : ३०ते सायंकाळी ५ : ३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.तरी सदर जीवनदान देणाऱ्या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे,असे आवाहन निकम मित्रपरिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!