अक्कलकोट, दि.८ : धोत्री येथील गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे यांच्यावर सोमवारी रात्री शोकाकुल वातावरणात दहिटणे (ता.अक्कलकोट) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी सकाळी त्यांचे सोलापूर येथे निधन झाले होते. त्यांच्या अंत्ययात्रेत संपूर्ण गोकुळ, गोकुळ – माऊली आणि मातोश्री परिवार सहभागी झाला होता.सहकार क्षेत्रात त्यांचे अतिशय
मोलाचे योगदान होते. संपूर्ण अक्कलकोट तालूक्यातील ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या सहकार्याने त्यांनी साखर कारखान्यांची निर्मीती केली होती.
यामूळे अनेकांना रोजगार मिळाला. शेतकऱ्यांविषयी त्यांना मोठी आस्था
होती.अंत्ययात्रेत माजी गृहराज्यमंत्री
सिध्दाराम म्हेत्रे,आमदार सचिन कल्याणशेट्टी,व्ही.पी.पाटील, मनोहर सपाटे,बब्रुवान माने देशमुख,सिध्दार्थ गायकवाड,व्यंकट मोरे,मल्लिकार्जून पाटील,विलास गव्हाणे,अशपाक बळोरगी,सिध्दाराम भंडारकवठे, उमाश पाटील,अंबणप्पा भंगे, दिलीप काजळे,माया जाधव,हमीद पिरजादे,शाकीर पटेल,शिवू स्वामी,शिवराज म्हेत्रे,महेश हिंडोळे,संजय इंगळे,दिलीप सिद्धे,काशिनाथ गोळ्ळे,पांडूरंग चव्हाण यांच्यासह चपळगाव पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.त्यांच्या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण अक्कलकोट तालूक्यातुन हळहळ व्यक्त होत आहे.गोकुळ माऊली शुगर्सचे गोकुळ शिंदे व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बलभीम शिंदे यांचे ते बंधू होते.भगवान शिंदे यांच्या पश्चात आई,पत्नी,तीन भाऊ,दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे.