ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारतातील पहिली वॅक्सिन दृष्टीपथात ; काही आठवड्यामध्ये लसीकरण मोहिम ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाहीय. दरम्यान, या वाढती रुग्ण संख्या आणि कोरोना लस या विषयावर आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान मोदी होते. दरम्यान, कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली वॅक्सिन दृष्टीपथात आली असून काही आठवड्यामध्ये लसीकरण मोहिम सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

मी यापूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. लस उत्पादनाच्या संदर्भात देशात काय तयारी आहे, याचा आढावा घेतला. वेगवेगळ्या टप्प्यावर 8 लसींची चाचणी सुरु आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. त्यामुळे जवळपास वर्षभरापासून लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या भारताच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कोविड १९ लस वितरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मिळून काम करावं लागणार आहे. यासाठी देशात कोल्ड चैनची व्यवस्था निर्माण करण्यावर आणखीन भर द्यावा लागणार आहे. करोना लशीसंदर्भात सर्वदलीय नेत्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे करोनाविरुद्धच्या देशाच्या लढाईला आणखीन मजबुती मिळेल, असंही पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठकीला संबोधताना म्हटलं.

कोरोनाच्या लसीकरणासाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. लसीचा साठा आणि त्याची मागणी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संचालित केली जाणार आहे. या लसीकरण अभियानाबद्दल देशात गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी मिळून अफवेपासून दूर राहावं, आणि जनतेलाही जागरुक करावं अशी मागणी त्यांनी केली. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी किंवा कोरोना लसीबाबत कोणत्याही पक्षाच्या नेत्याकडे एखादी सूचना असेल तर त्यांनी सरकारकडे लेखी पाठवावी, त्याचा गांभीर्याने विचार केला जाईल, अशी हमी पंतप्रधानांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!