भारतीय लहुजी सेनेतर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर;अकरा जणांचा समावेश, जिल्हाध्यक्ष देडे यांची माहिती
अक्कलकोट,दि.१२ : आद्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या व बालदिनाचे औचित्य साधून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांच्यावतीने जिल्हास्तरीय
आदर्श शिक्षक,आदर्श शिक्षिका पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.यामध्ये अकरा जणांचा समावेश आहे,अशी माहिती जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी दिली.
कोरोनासारख्या महामारीचे सकंट अजून टळलेले नाही.कोरोना सकंट थांबल्यानंतर कार्यक्रम घेऊन याचे वितरण केले जाईल,असेही ते म्हणाले.या आदर्श शिक्षक पुरस्कारा करीता निवड समितीने शिफारस केली होती.त्यानुसार याची निवड करण्यात आली आहे.
यात प्रा.प्रकाश सुरवसे (खेडगी महाविद्यालय अक्कलकोट ),शिवाजी भागंरे ( उपमुख्यध्यापक,शहाजी प्रशाला अक्कलकोट ),सुवर्णा बोरगावकर (कर्जाळ अक्कलकोट ),कुलदिप देशमुख (मोहोळ),विनायक कलुबर्मे, (मगंळवेढा ),दिवाकर काबंळे (मुख्याध्यापक न.प.शाळा बार्शी ),
समीना शेख (उर्दू शाळा आहेरवाडी ), सुनिता किरनळ्ळी (मुख्यध्यापिका जि.प.मराठी शाळा बासलेगाव),बालाजी हादवे (जि.प.प्रा.शाळा तोगराळ्ळी),अरुण काळे(शिवचलेश्वर कनिष्ठ महाविद्यालय मैंदर्गी),परमेश्वर भालेकर (न.प.शाळा सेंट्रस्कुल अक्कलकोट) हे सर्व शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.दरवर्षी जिल्हाध्यक्ष वसंत देडे हे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असतात.त्या अनुषंगाने हा कार्यक्रम होणार आहे.