---Advertisement---

भारतीय संघाला धक्का ; लोकेश राहुलची दुखापतीमुळे मालिकेतून माघार

On: January 6, 2021 1:09 PM
Follow Us:
---Advertisement---

सिडनी –ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी सामना जिंकत चार सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीय संघाला धक्का बसला आहे.

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुलला दुखापत झाली आहे. सरावादरम्यान मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे राहुलला या मालिकेतून माघार घ्यावी लागली असून तो लवकरच मायदेशी परतणार आहे.

सराव करत असताना राहुलच्या मनगटाला दुखापत झाली आहे. या दुखापतीतून पूर्ण बरे होण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याने उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी तो उपलब्ध नसेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

राहुल लवकरच भारतात परतणार असून बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीसाठी जाणार असल्याचेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!