ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘भारत बंद’ला महाराष्ट्रात प्रतिसाद ; सोलापूरमध्ये भुसार मार्केट आज बंद

मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना सहभागी झाल्या आहेत. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज राज्यातील अनेक APMC मार्केट, आडत बंद राहणार आहेत. अनेक रिक्षा संघटना, ट्रक चालक-मालक संघटनाही या बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे रस्ते आणि माल वाहतुकीवरही या बंदचा परिणाम पहायला मिळत आहे.

सोलापुरात भुसार-आडतीवरील लिलाव बंद

सोलापूरमध्ये भुसार मार्केट आज बंद आहे. त्याचबरोबर आडतही बंद ठेवण्यात आली असून सगळे लिलाव आज बंद आहे. श्रमजीवी संघटनेच्यावतीनं आज मोर्चा काढण्यात येणार आहे. आजच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय एसटी प्रशासनानं घेतलाय. तर लालबावटा रिक्षाचालक संघटनाही रिक्षा वाहतूक बंद ठेवणार आहे. त्याचबरोबर सोलापूर शहरातील सर्व 14 विडी कारखानेही आज बंद राहणार आहे. यंत्रमाग संघाने मात्र या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सोलापुरात भन्नाट घोषवाक्य!

भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी समाज माध्यमांमध्ये आज भन्नाट घोषवाक्य फिरताना पाहायला मिळत आहेत. त्यात ‘7/12 वर नाव टिकवायचं तर 8/12च्या संपात सामील व्हा’, ‘वावर हाय तर पावर हाय’ अशा घोषवाक्यांचा समावेश आहे. समाजमाध्यमांवर अशी घोषवाक्य टाकून नागरिकांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे.

या दरम्यान, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज लाक्षणिक उपोषण करणार आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून राळेगणसिद्धीमध्ये करणार उपोषण करणार आहे. तर

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!