---Advertisement---

स्वामींचे तैलचित्र आता शंभर वर्षापेक्षा जास्त काळ टिकणार ; माजी आमदार म्हेत्रेंकडून पाहणी

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.७ : स्वामीभक्तीला आध्यात्मकतेची जोड देवून चित्रकार दळी यांनी काढलेले तैलचित्रमय दर्शन म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थांचे दर्शन होत असल्याचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी सांगितले.
अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थान येथील ज्योतिबा मंडप
व शेजघर येथे चित्रकार प्रकाश
दळी यांनी देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या सहकार्याने तैलचित्र दर्शन कॅनव्हसवर काढल्यामुळे हे चित्र शंभर वर्षापर्यंत जसेच्या तसे राहणार असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. जुने गावचे घर, भिंत, कंदील, स्वामी यांची रचना त्यांनी अप्रतिम सादर केली आहे, असे महेश इंगळे यांनी सांगितले.
वटवृक्ष देवस्थानातील शेजघरात मंदिर स्थापनेपासून चित्रमय दर्शन होते. मात्र ते साध्या पध्दतीच्या चित्र काढत असल्यामुळे प्रत्येक वेळी चित्र काढावे लागत होते. मात्र हे तैलचित कॅनव्हसवर काढल्यामुळे या चित्राचे आयुष्य शंभर वर्षाहून अधिक राहणार असल्याचे चित्रकार दळी यांनी सांगितले.यावेळी भाविक,देवस्थानचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!