ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.भारत भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ; पुत्र भगीरथ भालकेकडून भडाग्नी

पुणे/पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके हे अनंतात विलीन झाले आहेत. आमदार भालके यांच्या पार्थिवावर सोलापूर जिल्ह्यातील मूळगाव सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा भागीरथी भालके यांनी वडिलांच्या चितेला भडाग्नी दिला. आमदार भारत भालके यांच्या अंत्यविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्ता भरणे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार भारत भालके यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.

भारत भालके यांचं पार्थिव सकाळी पुण्यावरुन पंढरपूरकडे रवाना झालं. पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर पार्थिव दाखल झाल्यानंतर, तिथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. त्यानंतर पार्थिव भालकेंचं मूळगाव सरकोली इथे नेण्यात आलं. दरम्यान, आमदार भारत भालके यांच्या अंत्यदर्शनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांना हेलिकॉप्टरचा प्रवास टाळावा लागला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!