---Advertisement---

पुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना ; अनिल देशमुख

On: November 28, 2020 6:27 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं असून त्या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. “पोलिसांच्या घरांचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून त्यामुळे पुढील चार वर्षात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना लवकरात लवकर पूर्ण करु असं त्यांनी सांगितलं. तसेच दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आणणार असून येत्या अधिवेशनात त्याचा मसुदा मांडला जाईल, असंही ते म्हणाले.

अनिल देशमुख म्हणाले की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस दलात साडेबारा हजार जागा भरण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला, असं गृहमंत्री म्हणाले. “मराठा आरक्षणामुळे भरती प्रक्रिया रखडली. परंतु कोणत्याही समाजावर अन्याय न करता पोलीस भरती प्रक्रिया राबवू.

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आणण्याचं काम सुरु केलं. पण कोरोनामुळे काम थांबलं होतं. ड्राफ्ट तयार झाला आहे. येत्या अधिवेशनात हा मसुदा विधीमंडळात मांडू त्याला एकमताने मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळेल असा हा कायदा असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!