मनुके आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते. मनुका दिसायला छोट्या परंतु शरीरासाठी भरपूर लाभदायक आहेत. आयुर्वेदामध्ये मनुकांना उपयुक्त औषधी मानले गेले आहे. सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खाल्ल्याने फायदे होतात. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते. रोज सकाळी उठून ५ मनुके खा. त्यावर कोमट पाणी प्या. मनुक्यांमध्ये आयर्न, सेलेनियम असते. ज्यामुळे स्टॅमिना वाढतो.
मनुका मधुर, शीतल, वीर्यवर्धक, तृप्तीकारक, वातानुलोमक (अपानवायू सहजतेने मोकळा करणारा) कफ-पित्तहारी, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक, रक्तशोधक तसेच रक्तप्रदरातही लाभदायी आहे. तर जाणून घेऊन बाकीचे काय आहेत मनुके खाण्याचे फायदे….
रक्तदाब
रक्तदाबाची समस्या असल्यास रात्री अर्धा ग्लास पाण्यात ८-१० मनुके भिजवा आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी ते पाणी प्या. इच्छा असल्यास भिजवलेले मनुकेही तुम्ही खावू शकता. यामुळे रक्तदाबाच्या समस्येवर नक्कीच फायदा होईल.
बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होईल
बदलत्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य आहे. मनुके खाल्याने पोट साफ होण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल.
ऊर्जा प्रदान करतात
ऑफिसमध्ये थकल्यासारखे वाटत असल्यास मध्ये मध्ये मनुके खात रहा. मनुके ऊर्जेचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. यात कार्बोहाइड्रेड आणि फायबर्स असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
रोज मनुक्यांचं नियमित सेवन केल्यामुळे आरोग्यास त्याचा फायदा होवू शकतो. मधुमेहवर देखील मनुके गुणकारी आहे. शिवाय कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील मनुके फायदेशीर आहेत.