ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बोर्डीत संपन्न

 

अक्कलकोट,दि.७ : प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार विरतण सोहळा संपन्न झाला.
बोर्डी मध्ये पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदे कडून हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते अक्कलकोट तालुका पत्रकार संघाला पुणे विभागातुन वसंतराव काणेआदर्श तालुका पत्रकार संध पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार अवकलकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार जगदाळे ,अरविंद पाटील, प्रशांत भगरे, शिवा याळवार , सत्तार शेख गोविंद शिंदे यांनी स्विकारला .
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे विधानसभा माजी अध्यक्ष तथा कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले, लोकशाहीत पत्रकाराच महत्व अबाधीत आहे . एकाधिकारशाहीमुळे लोकशाही धोक्यात आली आहे संघर्ष हेच पत्रकारिते च जीवन आहे . सत्तेच्या खुर्चीपेक्षा जनतेची खुर्ची मोठी आहे . शेतकरी पत्रकारा आंदोलन सध्याची राजकीय स्थिती पत्रकाराचे महत्व आदि विषयावर माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मार्मीक भाष्य केले .बोर्डीत यावर मोठे विचारमंथन होत असल्याचे सांगितले.
मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या कार्यक्रमात राज्याचे पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र जी गावित तसेच पालघर विधानसभा आमदार श्रीनिवास वनगा व विशेष अतिथी म्हणून तर माध्यम तज्ञ समिरण वाळवेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

समाजघटकामध्ये राजकारण्यामध्ये पत्रकाराच्या पत्रकाराच्या आरोग्याबाबत पत्रकार पेन्शनबाबत विविध समस्याबाबत मोठी आनास्था वेदनादायक आहे राज्यात १५० .पत्रकारानाही पेन्शन नाही . अनेक पत्रकार पेन्शन प्रस्ताव प्रलंबित आहेत .कोरोनाकाळात अनेक पत्रकाराना प्राण गमवावे लागले . अनेकांनां कोरोनाची लागण झाली .कोरोना योध्दा म्हणून पत्रकाराना शासनान आर्थीक मदत केली नाही . अनेक मोठी दैनिकांनी पत्रकारानां कमी केल अनेक पत्रकाराच्या नोकऱ्या गेल्या .छोटया दैनिकाची मोठी गळचेपी होत आहे . प्रिंट मिंडीया मोठया अडचणीत आहे . कालानुसारमाध्यमानी पत्रकारानी बदल स्विकार करणे गरजेचे आहे पत्रकाराचआर्थीक सक्षमीकरण अधिस्थिकृती च्या जाचक अटी दुर करणे पेन्शन योजना आरोग्य सुविधा आदि प्रश्न मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम देशमुख यांनी मांडून पत्रकारांनी आता अधिक जागरुकतेने संघटित होऊन संघर्ष करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संजीव जोशी, पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हर्षद पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष निरज राऊत, सल्लागार अच्युत पाटील, सरचिटणीस वैभव पालवे, उपाध्यक्ष हेमेंद्र पाटील व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!