मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या चौकशीवरून पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. सध्या देशात सुडाचं आणि बिनबुडाचं राजकारण सुरू आहे. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी प्रताप सरनाईक यांचा काही संबंध नाही. जर गुन्हा वाटत असेल मराठी माणसाने उद्योग करणे हा केंद्रीय सरकारला गुन्हा वाटतो का? असा सवाल संजय राऊत केला आहे.
तुमच्या 100 नव्हे 120 नेत्यांची यादी देतो
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्याकडे भाजपच्या 100 नेत्यांची यादी असेल तर त्यांनी ईडीला जरूर द्यावी. त्याची चौकशी करण्याची हमी मी देतो”,असे म्हणाले होते. याच विषयावरून संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. आधी तुम्हाला काय चौकश्या करायच्या त्या करून घ्या. मग तुमच्या 100 नव्हे 120 नेत्यांची यादी देतो. त्यांच्याही चौकश्या होऊनच जाऊ द्या”, असं आव्हानच संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिलं आहे.
“प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी यांचा काही संबंध नाही. मराठी माणसाने उद्योग करणे हा केंद्रीय सरकारला गुन्हा वाटतो का? असा सवाल करतानाच व्यवसाय-उद्योग करणाऱ्या मराठी माणसावर चौकशा लावाल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर उभा राहील, असा इशाराही त्यांनी दिला. चौकशीला कुणीही घाबरत नाही. आता तुम्ही घाबरा. महाराष्ट्रात आमची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, असा इशारा राऊत यांनी दिला.