सोलापूर : सोलापूरचे सुरमणी व महाराष्ट्रचे महागायक मोहंम्मद अयाज यांचे नाव आता वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद करण्यात आले आहे. अयाज हे गेळी अनेक वर्षे संगीत कला क्षेत्रामध्ये कार्यरत असुन आपल्या कलेच्या माध्यमातून देश विदेशामधे सोलापूरचे नाव लौकिक केले आहे.2020 मध्ये अनेक गाणी रसिकांच्या भेटीस घेऊन आले.
झी म्यूझिक कंपनी आणि टी सिरिस म्युझिक कंपनीद्वारे प्रकाशित करण्यात आले.ही गाणी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर , पद्मविभूषण अनुराधा पौडवाल, पद्मविभूषण अनुप जलोटा , पद्मश्री सुरेश वाडकर , हेमलता, सपना अवस्थी , विनोद राठोड , सिल्वर ज्युबली विश्वजीत , साधना सरगम , सिनेअभीनेत्री वर्षा उसगाकर , सुफी गायक रामशंकर अशा वेगवेगळया गायक व गायीकांसोबत गाणी ध्वनिमुद्रण केले.
त्यांच्या समवेत अनेक कार्यक्रम सादर केले.दूरचित्रवाहीनीच्या सिंगीग रियाअलीटी शो मध्ये मोहम्मद अयाज यांनी दोन वेळा विजेतेपद भुषीविले असुन वेगवेगळया देशांमध्ये जाऊन सोलापूरचे नाव लौकिक केले.आपल्या गाण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता ही जपलेली आहे.कोरोना जन जागृतीसाठी अनेक गाणी बनवली.
गाण्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली. संगीत क्षेत्रामधे अनेक पुरस्कार प्राप्त व कार्याची दखल घेऊन वर्ल्ड रेकार्डसचे संपादक डॉ. मुकुल सोनी यांनी मोहम्मद अयाज यांच्या नावाची निवड केली आहे. लवकरच हे मानपत्र एका मोठ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.अयाज यांनी यशवंत राऊत व संपूर्ण जागतीक रेकाँर्डस् टीमचे यानिमित्ताने आभार मानले आहेत. हा मान माझा नसुन माझ्या सोलापूरकरांचा आहे, अशी भावना मोहम्मद अयाज यांनी व्यक्त केली आहे.