ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मातंग समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आंदोलन

 

अक्कलकोट,दि.२१ : लोकशाहिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा,त्यांचे राष्ट्रीय स्मारक घाटकोपर चिरागनगर येथे व्हावे, मातंग समाजास अ, ब, क, ड वर्गवारी प्रमाणे स्वतंत्र आरक्षण द्यावे यासह विविध मागण्या संदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 23 रोजी (शुक्रवारी) मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट सोलापुर येथे एकदिवशीय धरणे आंदोलन होणार असून या आंदोलनात अक्कलकोट तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती भारतीय
लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत
देडे यांनी दिली.त्याशिवाय
महाराष्ट्र शासनाने मातंग समाजास वर्गवारीप्रमाणे आरक्षण द्यावे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास केंद्र व राज्य सरकारने १ हजार कोटी रुपये देवून महामंडळ सक्षम करावे, अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक घाटकोपर चिरागनगर येथे मंजूर असलेले स्मारक त्वरीत उभे रहावे, क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशींची शासनाने त्वरीत अंमलबजावणी करावी, क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे आयोगाचे पुर्नगठन करावेत, संगमवाडी (पुणे) येथील क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभे करावेत आदी विविध मागण्या संदर्भात जिल्ह्यातील तमाम मातंग समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात बहुसंख्य समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय लहुजी सेना जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!