मुंबई,दि.६ : माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून आज सकाळी मुंबई येथील
वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभागातील पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांची तसेच परिवारातील इतर सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी केली.
यामध्ये त्यांनी सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले व आरोग्याची माहिती भरून घेतली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी या पथकाशी चर्चा करून या मोहिमेची अंमलबजावणी कशा रीतीने केली जाते त्याविषयी विचारले तसेच सूचना केल्या. अशा प्रकारची तपासणी सर्वांनी करून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.