ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुळेगावं तांडा परिसरातील अवैद्य हातभट्ट्यावर छापे ; १२ लाखाचा मुद्देमाल नष्ट

सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतील मुळेगाव तांडा, परिसरात अवैद्य रित्या हातभटटी दारू तयार होणा-या चौदा ठिकाणावर छापे टाकुन १४ इसमा विरूध्द् गुन्हे दाखल करून सुमारे १२,३९,२००/- रू. मुददेमाल नष्ट करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण चा पदभार स्वीकारल्या पासुन अवैध व्यवसायावर कारवाईची विशेष मोहिम राबवण्यात येत असुन त्याचाच एक भाग म्हणुन आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आज दि. ०९/०१/२०२१ रोजी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर गावाच्या शिवारात हातभटटी दारूच्या अडयावर कार्यवाही करण्याच्या उददेशाने, सोलापूर विभाग, स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त पणे विशेष मोहिम राबवण्यात आली होती.

सदर मोहिमे दरम्यान मुळेगाव तांडा, तालुका दक्षिण सोलापूरच्या परिसरामध्ये अवैधरित्या हातभटटी दारू तयार करणाऱ्या एकुण चौदा ठिकाणावर छापे टाकण्यात आले असुन १४ आरोपीं विरूध्द् भा.द.वि कलम ३२८ व दारूबंदी कायदया अन्वये गुुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हातभटटी दारू तयार करण्याचा १२, ३९,२००/-रू (बारा लाख एकोनचाळीस हजार दोनशे रूपये) किमतीचा मुददेमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्याचे काम चालु आहे.

सदरच्या कामगिरी मध्ये श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, पोलीस अधीक्षक,  श्री.अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रभाकर शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी प्रत्यक्ष सहभागी होवून त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक, श्री. सर्जेराव पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, सुहास जगताप, पो. नि. फुगे, रापोनि काजोळकर, सहा.पो.नि बंडगर, बुवा, चैधरी, म सहा. पो.नि. तावरे, पो.स.ई/दळवी, इंगळे, पिगुवांले, म.पो.स.ई गोडबोले तसेच सोलापूर ग्रामीण कडील आर.सी.पी. पथक, क्यु.आर.टी.पथककातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारानी सदर कारवाईत भाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!