माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख आपली वाणी, विचार, आणि कर्मानीच होते.ही खरी गोष्ट आहे.अशाच वाणी, विचार आणि चांगल्या कर्माने पुढे येत असलेले खंबीर नेतृत्व म्हणजे युवा नेते महेश शावरी.
तसे पाहिले तर त्यांना लहानपणापासून राजकीय
वारसा आहे.पण केवळ राजकारण असे न करता त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे.आज गोर-गरीब जनता महेश शावरी यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे.त्यांच्या घराण्यातील आजोबा कै. पूनप्पा फ. शावरी व लहान आजोबा माजी नगराध्यक्ष चनबसप्पा फ. शावरी व वडील बसवराज पू.शावरी यांनी समाजातील गोर गरीबांच्या समस्या दूर करून आर्थिक मदत केली आहे.सामाजिक कार्याची परंपरा तशी पूर्वीचीच आहे.अशा या दानशूर व सुसंस्कृत कुटुंबात महेश शावरी यांचा जन्म झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मैंदर्गी, माध्यमिक शिक्षण शिवचलेश्वर हायस्कूल तर उच्च माध्यमिक शिक्षण वालचंद कॉलेज सोलापूर येथे झाले.पुढे अभियांत्रकी शिक्षण पंढरपूर येथे झाले. ते उच्च शिक्षित असून सध्या सिंगापूर येथे नामांकित स्विस बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.खरे तर मैंदर्गीसारख्या गावात शिकून सिंगापूर येथे मोठया पदावर काम करणे आणि पुन्हा गावाबद्दल इतकी मोठी तळमळ असणे ही दुर्मिळ गोष्ट आहे पण ‘घार उडे आकाशी,त्याचे चित्त पिलापाशी’असे नेहमी
त्यांचे लक्ष मैंदर्गी गावाकडे असते.सध्याच्या युगात युवकांना परदेशाचे आकर्षण जास्त आहे. परदेशी गेल्यावर त्यांचे आणि गावाचे नाते तुटते. परंतु महेश शावरी यांनी तसे न करता सामाजिक बांधिलकी म्हणून सिंगापूर येथे वास्तव्यास राहून देखील गावासाठी सतत कार्य करीत आहेत.ही बाब भूषणावह आहे.सदैव गावाच्या विकासासाठी त्यांना जे काही करता येईल ते करीत असतात.मैंदर्गीत गरीब
व गरजू लोकांना तर ते नेहमी मदत करत असतात. एखादा अडचणीत असेल शेतकऱ्यांची समस्या असेल किंवा एखाद्या गरीब व्यक्तीच्या मुलीच्या लग्न कार्यासाठी आर्थिक मदत असेल ते काळजीने करतात. आजारी व्यक्तींना वैदयकिय मदत करतात. युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक व्याख्याने आयोजित करतात. माध्यमिक शाळेतील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देतात.सामुदायिक विवाह सोहळा आयोजन करून अनेक गरीब कुटुंबांचा स्वप्न पूर्ण करायचे त्यांचे काम खरोखरच महान आहे.त्याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव, शिव-बसव जयंती, ग्रामदैवत यात्रा महोत्सव, धार्मिक उत्सवाच्या वेळी महाप्रसादाचे आयोजन करतात. अनेक सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा तरुण मंडळाना आर्धिक मदत ते करत असतात. वृक्षारोप, ग्राम स्वच्छता कार्यक्रम, रक्तदान शिबीर, आयोजन करतात.त्याचे एकच ध्यास आहे तो म्हणजे आपले मैंदर्गी शहर विकास संपन्न व समृद्धशाली शहर बनविण्याचा. ओळखले जावे.लॉकडाऊन काळात देखील लोकांना सॅनिटायझर आणि धान्य वाटप केले आज गेली पाच – सहा वर्षे झाली असे काम अविरतपणे सुरू आहे.अशाच प्रकारे कार्य त्यांनी सतत करावे यासाठी त्यांना ३७ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !