दुधनी,दि.२७ : मैंदर्गी शहराचे २०१०
ते २०१२ या कालावधीत भुमी अभिलेख कार्यालयामार्फत खाजगी कंपन्यांकडून सदोष सिटी सर्व्हे करण्यात आले होते. सनद दुरूस्तीसाठी व फेर सिटी सर्वे भुमीअभिलेख कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही काम होत नव्हते, यामुळे बांधकाम व घर खरेदी विक्री व्यवहारात अनेक अडचणी येत आहेत.शासनाने केलेल्या सदोष सिटी सर्वे रद्द करून फेर सिटी सर्वे करण्यात यावे, या मागणीसाठी मल्लीनाथ कुंभार व मक्तूम लुकडे यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मैंदर्गी नगरपरिषदेच्या समोर आमरण उपोषणासाठी बसले होते.
दिवसभर मैंदर्गीतील अनेक पक्ष, सामाजिक संस्था, विविध संघटना आदींनी या उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शविला. यावेळी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचेचे तालुकाध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे, अक्कलकोट नगर परिषदेचे नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी आदींनी भेट देऊन विचारपूस केली.
उपोषणाचा दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी ११.४५ दरम्यान जिल्हा भुमी कार्यालय सोलापूरचे अधीक्षक हेमंत सानप यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण कर्त्यांच्या मागणीप्रमाणे सिटी सर्वे ४८% पेक्षा जास्त चुका आढळून आल्यास फेर सिटी सर्वे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच दि. १ फेब्रुवारी पासून भुमी अभिलेख कार्यालयाकडून एक कर्मचाऱ्याची नेमणूक करून त्रुटीची प्रत्यक्ष शहानिशा करणार असल्याचे लेखी पत्र देवून उपोषण माघार घेण्यासाठी विनंती केली.
प्रत्यक्ष अधिक्षकांनी लेखी पत्र दिल्यामुळे उपोषणातून माघार घेण्यात आली.यावेळी गावातील सामाजिक, राजकीय,प्रतिष्ठित व्यक्ती, गावातील इतर नागरिकही उपस्थित होते.
यांच्याकडून मिळाला
जाहिर पाठींबा
भारतीय जनता पक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, छत्रपती प्रतिष्ठान मैंदर्गी, रिपाई आठवले गट, सिध्दरामेश्वर नाट्य संघटना, डाॅ.पंडीत पुट्टराज गवई चॅरिटेबल ट्रस्ट,बसवराज मसुती म्युझियम चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय विद्यार्थी सेना,
कोळी समाज संघटना