ध्यास विश्वसार्ह बातमीचा

युवकांना रोजगार देण्यासाठी सोलापुरात आयटी इंडस्ट्रीसाठी प्रयत्न करणार ; आ. रोहित पवार

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरातील युवकांना रोजगार देण्यासाठी सोलापुरात आयटी इंडस्ट्री आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार नाही व्यक्त केला आहे. विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मेळावा घेतला. या मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती

यावेळी सोलापूर शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, मोहोळ तालुका पंचायत समितीचे सदस्य अजिंक्‍यराणा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

एमआयडीसीमध्ये अधिक उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार

सोलापूर शहरातून दरवर्षी चार ते चार ते पाच हजार युवक पदवी घेऊन बाहेर पडतात. त्यामध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या युवकांना रोजगार नाही म्हणून तेथे स्थलांतरित होतात. सोलापूर शहर व परिसरातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार देण्यासाठी आयटी इंडस्ट्री व येथील एमआयडीसीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू, याशिवाय येथील एमआयडीसीमध्ये अधिक उद्योग आणण्यासाठी देखील आपण प्रयत्न करू असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

शहराच्या विकासासाठी व शहरात नव्याने येणाऱ्या एमआयडीसीच्या विकासासाठी विमानतळ आवश्‍यक आहे. परंतु विमानतळ नसेल तर विकास होणारच नाही असे नाही. सोलापूरची विमानसेवा सुरू व्हावी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. भाजपमधील अनेक नेत्यांचा विवाह लव जिहाद पद्धतीने झाला आहे. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, मी त्यामध्ये जास्त खोलात जात नाही, परंतु सध्या युवकांचे प्रश्‍न वेगळे आहेत. उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर लव जिहादचा मुद्दा पुढे केला जात आहे. युवकांना सध्या त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने, भाजपने प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!