---Advertisement---

कार-टँकरच्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यासह चार जणांचा मृत्यू

On: November 26, 2020 6:19 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड : बीड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला.  कार व ऑइल टँकरच्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) सकाळी दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई शहराजवळ घडलीय.  मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा समावेश आहे.

वंचित आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह संतोष भिंगे,प्रा. सुभाष भिंगे,महादेव सकटे यांचा मृतांमध्ये समावेश आहे तर राम भिंगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.लातूर येथील हे सर्वजण राम भिंगे यांच्या मुलीसाठी स्थळ पाहण्यास गुरुवारी कारमधून क्र. (एम एच 46 बी जी 9700) औरंगाबादला जात होते.  ते गेवराई शहरातील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाह्यवळण रस्त्यावर आलेले असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला अन भरधाव कार रस्ता दुभाजक ओलांडून औरंगाबादहून बीडकडे जाणार्‍या इंडियन ऑईलच्या टँकरवर क्रं. (जी जे 16 ए यु 2475) जाऊन आदळली.

या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच राम भिंगे हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिस ठाण्याचे पो.नि. पुरुषोत्तम चोबे, सहाय्यक निरीत्तक्षक संदीप काळे, पो.कॉ.खरात, राठोड,चव्हाण ,वरकटे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.अपघात इतका भीषण होता की, टँकरच्या धडकेत गंभीर मार लागल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावरील वरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!