ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात सध्या सोफा एक आणि बसणारे तीन अशी स्थिती झालीय ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला. राज्यात सध्या सोफा एक आणि बसणारे तीन अशी स्थिती झाली आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

 

पिंपरी: तज्ञ समितीने मान्यता देऊनही राज्य सरकार आदिवासी समाजाला थेट पद्धतीने अनुदान देत नाही. राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांना केवळ खरेदीत रस आहे. कोणाला किती मलिदा मिळेल, यावरून सरकारमध्ये चाललेल्या भांडणात आदिवासी समाज योजनांपासून वंचित राहत आहेत, अशी टीकाही फडणवीस यांनी आज केली. सरकारमधील तिन्ही पक्ष तीन वेगवेगळ्या दिशेने चालत असल्याने राज्याची अवस्था वाईट झाली आहे, असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला.

 

भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती / आदिवासी मोर्चाच्या वतीने भोसरी येथे अयोजित महाराष्ट्र प्रदेश कार्य समितीच्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते.

 

सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. सरकारमधील तीनही पक्ष तीन वेगवेगळ्या दिशेला चालले आहेत. त्यामुळे राज्याची अवस्था वाईट झाली आहे. सध्या सोफा एक आणि बसणारे तीन अशी राज्याची परिस्थिती आहे. त्यांना बसायलाच जागा नाही. मात्र, आपल्याकडे बसणारा एकच आहे, त्यामुळे आपल्याला बसायला खूप जागा आहे. आपल्याला भरपूर राजकीय जागा निर्माण झाली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेले घवघवीत यश, हे बोलके आहे. ३ पक्ष एकत्र आले तरी सर्वांत मोठा पक्ष हा भाजपाच झाला. जनता आपल्यासोबत आहे, असे विधानही यावेळी फडणवीस यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!