अक्कलकोट, दि. ३० : अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या देशव्यापी निधी समर्पण अभियानात आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी यांनीही आपला सहभाग नोंदवित १ लाख ५१ हजार रूपयांचा धनादेश समर्पित केला.
आमदार कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात हा धनादेश त्यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या तालुका कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केला. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून या अभियानाचा प्रारंभ १५ जानेवारी रोजी झाला होता.श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन निधी संकलनाचे अभियान सुरू आहे.२७ फेब्रुवारीपर्यंत हे देशव्यापी अभियान सुरू राहणार असून १२ कोटी कुटुंबांशी संपर्काचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य
मंदिर साकार होतेय.यानिमित्ताने एकप्रकारे आपल्या सर्वांची स्वप्नपूर्तीच होते आहे.
आज या एका ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अस्मितेच्या कार्यासाठी मला निधी समर्पित करता आला, हे मी माझे भाग्य समजतो. आपणही सारे या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन आमदार कल्याणशेट्टी यांनी केले आहे.
यावेळी निधी संकलन प्रमुख चेतन जाधव ,चंद्रकांत जकापूरे,सुशील हिरजकर,तम्मा शेळके,संतोष वगाले,
प्रसाद हारकुड,शिवशंकर स्वामी आदी उपस्थित होते.
११३ गावात निधी
संकलन सुरू
अक्कलकोट तालुक्यात गावोगावी निधी संकलन सुरू आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.प्रत्येक गावात आठ ते दहा कार्यकर्ते हे काम करत आहेत.या अभियानात सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात येत आहे.