पंढरपूर, दि.२९ : देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पंढरपूर तालुक्यातील भोसे गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पाटील कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन नातेवाईकांशी विचारपूस केली. काही अडचण आली अथवा मदत लागली तर फोन करा,राष्ट्रवादी पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,अशी ग्वाही कै.राजबापू पाटील यांचे बंधू शेखर पाटील व गणेश पाटील यांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजबापू पाटील यांचे कोरोनामुळे गेल्या महिन्यात निधन झाले होते.
त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.कै.यशवंतभाऊ पाटील आणि राजबापू पाटील
या दोघांचे पवार कुटुंबांशी जवळचे संबंध होते. त्यामुळे पवार यांनी ही भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, आमदार यशवंत माने, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, दीपकआबा साळुंखे आदी उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.