ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रिपब्लिकन पक्षाचा आज उपोषणाचा दुसरा दिवस,वाळु मिळेपर्यंत उठणार नाही – मडिखांबे

 

अक्कलकोट,दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील विविध प्रश्नांवर रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाचा सलग दुसरा दिवस आहे.अद्याप प्रशासनाने दखल घेतली नाही जो पर्यंत बांधकामला वाळु मिळणार नाही तोपर्यंत उठणार नाही,असा इशारा तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी दिला आहे.
रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्त्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळु मोफत देण्यात यावी,वाळु उपलब्ध नसल्यामुळे बांधकाम कामगार व मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तरी त्वरित वाळु लिलाव काढुन वाळु उपलब्ध करण्यात यावे,पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी, श्रावण बाळ योजना व निराधार योजनेतील लाभार्थींना अनुदान लवकरात लवकर वाटप करावे यासह अन्य मागण्यासाठी उपोषण सुरू असून या उपोषणास राष्ट्रीय समाज पक्ष,शिवसेना शहर व तालुका,प्रहार संघटना, भीमशक्ती सामाजिक संघटना,दलित स्वयंसेवक संघ,ए आय एम आय एम,माळी महासंघ अक्कलकोट तालुका,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोशिअन,यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी भाजप तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड,शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार तालुका उपप्रमुख प्रविण घाटगे, माळी महासंघ तालुका अध्यक्ष संतोष पराणे, मातंग समाज अध्यक्ष सुनील खवळे, नगरसेवक विकास मोरे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, रासापाचे दत्ता माडकर, तेजस झुजे भारत राजेगावकर, आकाश सुरवसे, रिपाइं चिटणीस सैदप्पा झळकी, रिपाई तालुका उपाध्यक्ष अंबादास गायकवाड चंद्रकांत गायकवाड शहर अध्यक्ष प्रसाद माने कृष्णा धोडमणी, इराण्ण धसाडे,शिवानंद धोडमणी, शहर संघटक अंबादास शिंगे,नागेश कांबळे सचिन बनसोडे शुभम मडीखांबे, सुरेश गायकवाड, तमा धसाडे, शशिकांत भोसले,बसु गजधाने, रवी सलगरे यांनी पाठिंबा दिला आहे. सदर आमच्या मागण्या स्थानिक प्रशासनांनी आमच्या मागण्या वरिष्ठ प्रशासनास कळवावे अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाई युवक तालुका अध्यक्ष आप्पा भालेराव यांनी दिला आहे.याप्रसंगी नायब तहसीलदार डि एफ गायकवाड यांनी आजच जिल्हाधिकारी यांना पाठवलेले पत्र माहितीसाठी उपोषण ठिकाणी उपस्थित पदाधिकारी यांच्याकडे दिले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी प्रत्यक्ष वाळू दिल्याशिवाय उपोषण माघार घेणार नाही, असा इशारा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!