ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वर्ध्यातील बँकेवर दरोडा ; लाखोंच्या रोकडसह साडेतीन किलो सोने, दुचाकी घेऊन दरोडेखोर पसार

वर्धा : वर्ध्यातील मुथुट फायनान्सच्या बँकेवर आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी लाखोंची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटले. त्यानंतर कर्मचाऱ्यांची दुचाकी घेऊन पसार झाले. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

 

वर्ध्यामध्ये मुथुट फायनान्सच्या शाखेवर आज, सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी दरोडा पडला. दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून तीन लाख १८ हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटले. लुटीनंतर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या दुचाकीवरून पोबारा केला. दरोडेखोराने बँक व्यवस्थापकांच्या कमरेला पिस्तूल लावले आणि चेंबर पेटीतून लाखोंची रोकड लंपास केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

या दरोड्याची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. बोटांचे ठसे आणि दरोडेखोरांचे रेखाचित्र तयार करण्याचे काम सुरू आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जात आहे. सकाळी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे वर्ध्यामध्ये खळबळ माजली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!