---Advertisement---

मध्य रेल्वेवरील प्रवाशांना गारेगार दिलासा ; आजपासून एसी लोकल सुरु

On: December 17, 2020 12:48 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई :  गेल्या ९ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईच्या लोकलचे दार बंदच आहे. पण आता मध्य रेल्वेवरील प्रवाशांना गारेगार दिलासा मिळाला आहे.  अत्यावश्यक प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर गुरुवारपासून वातानुकूलित लोकल सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे

 

मध्य रेल्वेवर सोमवार ते शनिवार रोज या एसी लोकलच्या दिवसाला 10 फेऱ्या असणार आहेत. सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर ही लोकल धावणार आहे.

 

सोमवार ते शनिवार सकाळी 5.42 ते रात्री 11.25 या वेळेत एसी लोकल धावणार आहे. यात दोन सीएसएमटी ते कल्याण, चार सीएसएमटी ते डोंबिवली आणि चार सीएसएमटी ते कुर्ला अशा फेऱ्या असणार आहेत. पहिली लोकल सकाळी 5.42 ला कुर्ल्यावरून सीएसएमटीसाठी सुटेल,  तर शेवटची लोकल रात्री 11.25 ला वाजता सीएसएमटीवरून कुर्ल्यासाठी सुटेल.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!