---Advertisement---

एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; कारने मुंबईकडे रवाना!

Follow Us:
---Advertisement---

पंढरपुर (वृत्तसंस्था) – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर येथून मुंबईकडे रवाना होण्यासाठी ते हेलिपॅडवर पोहोचले होते. हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतरच तांत्रिक बिघाड लक्षात आला. त्यामुळे त्यांचा मुंबई प्रवास लांबणीवर पडला असून अखेर त्यांनी कारने मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर पहिलं इंजिन सुरू झालं; मात्र बॅटरी कमी असल्याने दुसरं इंजिन सुरू होऊ शकलं नाही. पायलटकडून प्रयत्न करूनही बिघाड दूर झाला नाही. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता होती.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आमदारांनी जोखीम न घेता रस्तेमार्गे प्रवास करण्याची विनंती केली. सूर्यास्तानंतर हेलिकॉप्टरने प्रवास करणे जोखमीचे ठरू शकते, तसेच मुंबईला पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता असल्याने एकनाथ शिंदे यांनी कारने जाण्याचा निर्णय घेतला.

आमदार अभिजीत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार उत्तम जानकर आणि त्यांचे स्वीय सहाय्यक असून ते ताफ्यासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

दरम्यान, कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कार्तिकी यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच यात्रेसाठी रस्त्यांची कामे आणि इतर सुविधांकरिता पाच कोटी रुपयांचा निधीही दिला.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!