सोलापूर, दि.२ : विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे सर्व उपक्रम चांगले आहेत. त्यांच्या उठावदार उपक्रमांमुळे
इतर मंडळांनाही प्रेरणा मिळते,असे प्रतिपादन सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी राजेंद्र दासरी यांनी केले.
नववर्षाच्या प्रारंभी जेष्ठ नागरिक आणि
गुणी जणांचा सत्कार विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळच्यावतीने नेहरूनगरच्या शासकीय मैदानावर पार पडला.त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समाजात मंडळे अनेक असतात परंतु सेवाभावी वृत्तीने सामाजिक बांधिलकीतून काम करणारे लोक फार कमी असतात. विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासत सोलापूरमध्ये गणेशोत्सवाला एक वेगळे मोठे वलय प्राप्त करून दिले आहे, असे सांगून मंडळाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य नरेश बदनोरे होते यावेळी साईश्वर गुंटूक याने लंडन येथे २१ किलोमीटरची ६७ वी मॅरेथॉन शर्यत पूर्ण केल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला नगरसेवक प्रभाकर काका जामगुंडे , विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे विभागीय अधिकारी सुहास काकडे , सहाय्यक अधिकारी बाबुराव सामंत, संस्थापक विजयकुमार शाबादी, मंडळाचे अध्यक्ष प्रसाद गोटे यांच्यासह जेष्ठ नागरिक आणि खेळाडू मोठया संख्येनं उपस्थित होते.