---Advertisement---

रासप जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर यांना योग्य वेळी संधी देऊ : आ. कल्याणशेट्टी ; बंडगर यांचा वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये सत्कार

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट ,दि.१ : अक्कलकोट तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांचे कार्य मोठे आहे त्यांना योग्य वेळी संधी देऊ,असे आश्वासन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिले.शुक्रवारी, राष्ट्रीय समाज
पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर यांचा ४८ व्या वाढदिवसानिमित्त आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. नगरसेवक महेश हिंडोळे, नागराज कुंभार, बाळा शिंदे, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रदीप पाटील, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, रासपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्ता माडकर, रवी सलगरे, कृष्णा कोटी, बसवंत कलशेट्टी, धनंजय गाढवे, वासू कडबगावकर, शिवानंद बिराजदार आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, अत्यंत अल्पावधीत आपल्या स्वकर्तृत्वाने तालुक्यातील बहुजन समाज बांधवांना जागे करुन त्यांना एकजूट करण्यात बंडगर यांचे मोलाचे योगदान आहे. भविष्यात पंचायत समितीच्या निवडणुकीत सुनिल बंडगर यांना भाजपाचे मिञपक्ष असलेल्या रासपला जागा सोडून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी देखील बंडगर यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी माजी मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब दो़डतले, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रासपचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, मराठवाडा प्रमुख विष्णू गोरे , अहमदनगर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा जऱ्हाड पाटील यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!