अक्कलकोट (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार डॉ रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार व रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस माजी मंत्री राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वात अक्कलकोट तहसीलदार कार्यालयावर वीजबिल ५०% टक्के माफ करा* या मागणीसाठी आंदोलन करण्यातआले.
कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकार ने मागील 8 महिने लॉकडाऊन केले त्या लॉकडाऊनच्या काळात कोणताही रोजगार कामधंदा नसल्याने सामान्य जनता दुर्धर आर्थिक संकटाला तोंड देत आहे. अशा काळात राज्य सरकार ने जनतेच्या पाठीशी उभे राहिणे आवश्यक असून वीजबिलाची मोठी रक्कम जनता भरू शकत नाही,वीज वापरली हे खरे असले तरी लॉकडाऊनच्या काळात जनतेला रोजगार काम धंदा आर्थिक उत्पन्न नसल्याने गरीब सामान्य माणसांचे हित पाहणे राज्य सरकार चे काम आहे. त्यामुळे वीज वापरली आहे तर सर्व वीज बिल भरा ही राज्य सरकार ची भूमिका चुकीचा आहे. तरी राज्य शासनाने त्वरित सर्व वीजबिल ५०% माफ करावे अश्या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांना देण्यात आले.
यावेळी रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष सोपान गायकवाड, युवक तालुका अध्यक्ष आप्पा भालेराव, शहर अध्यक्ष प्रसाद, तालुका उपाध्यक्ष अंबादास गायकवाड,चंद्रकांत गायकवाड रिपाइं तालुका सचिव राजु भगळे, तालुका कार्याध्यक्ष विलास गायकवाड, अप्पशा लछान, युवक तालुका उपाध्यक्ष विजयकुमार पोतेनवरु, माने,सुरज सोनके,रिपाइं नेते प्रा सुनिल थांब शहर संघटक अंबादास शिंगे, रिपाइं मातंग आघाडी तालुका अध्यक्ष चंदू गायकवाड,शिरवळा शाखा अध्यक्ष उत्तम गायकवाड, बोरोठी शाखाध्यक्ष राजु कांबळे कुरनूर शाखा अध्यक्ष राजु गवळी, अंधेवाडी शाखा अध्यक्ष रमेश धोडमणी, अक्कलकोट शाखा अध्यक्ष किसन कदम, दत्ता कांबळे,जयभीम गायकवाड,दिनेश गायकवाड,नागेश कांबळे,रवी कांबळे,दत्ता धोडमणी,तमा धसाडे, रवी सलगरे,शुभम मडिखांबे, अनिल बाळशंकर, मंजुनाथ बनसोडे मोहन बनसोडे, जयभीम भगळे,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते