---Advertisement---

सोलापूर शहरात आज ३० नव्या रुग्णांची नोंद

On: November 26, 2020 5:58 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर :  शहरात मागील गेल्या काही दिवसापासून नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची सख्या अधिक आढळून येत होती. मात्र, आज बरे होणार्या रुग्णांपेक्षा बाधित रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे. आज दिवसभरात शहरात ३० नव्या बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर १७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. दरम्यान, आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज आढळले आलेल्या रुग्णांमध्ये 22 पुरुष तर 8 स्त्रियांचा समावेश आहे. आज मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1120 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 1090 निगेटीव्ह आहेत. तर ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10,267 असून एकूण मृतांची संख्या 561 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 448 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 9258 इतकी आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!