ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वीरशैव व्हीजनतर्फे यंदा सिद्ध सजावट स्पर्धा 2021

सोलापूर : ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि त्यांचे मंदिर याचे मार्केटिंग आणि ब्रॅंडिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वीरशैव व्हीजनतर्फे यंदा ‘सिद्ध सजावट स्पर्धे’चे आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी दिली.

घरबसल्या भक्तांना सिद्धेश्वरांची भक्ती करता यावी, त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय व्हावा आणि भक्तांच्या कल्पनाशक्ती आणि सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी ‘श्री सिद्ध सजावट स्पर्धा 2021’ घेण्यात येत आहे. घरामध्ये सिद्धेश्वर यांची प्रतिमा अथवा मूर्ती स्थापन करून त्यासमोर त्यांच्या जीवनातील कार्य अथवा प्रसंग, मंदिर परिसर आणि यात्रेतील सोहळे यापैकी कोणत्याही विषयावर आधारीत सजावट करावयाचे आहे.

सदरहू स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी 9604045418, 9767544552 या क्रमांकावर संपर्क साधावा. नोंदणीची अंतिम तारीख 12 जानेवारी आहे.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस 11 हजार रुपये कै. सिध्दव्वाबाई संगप्पा वाले यांच्या स्मरणार्थ प्रकाश वाले यांच्याकडून, द्वितीय बक्षीस 9 हजार रु. सुदीप चाकोते यांच्यावतीने तृतीय बक्षीस 7 हजार रु. कै. सुरेखा मल्लिनाथ हेले यांच्या स्मरणार्थ विजयकुमार हेले यांच्यावतीने, चतुर्थ क्रमांक 5 हजार रु. कै. गंगाधर शेटे यांचे स्मरणार्थ शिवानंद शेटे यांच्यावतीने, उत्तेजनार्थ बक्षीस 3 हजार रु. कै. सुनिता साखरे यांच्या स्मरणार्थ संजय साखरे यांच्याकडून तर उत्तेजनार्थ दुसरे बक्षीस 3 हजार रु. कै. लवंगे गुरुजी यांचे स्मरणार्थ सोमेश्वर लवंगे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यासोबतच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र कै. मूत्यप्पा बिराजदार यांचे स्मरणार्थ विजयकुमार बिराजदार यांचे वतीने देण्यात येणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेस उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर याबाजी, उपाध्यक्ष सिद्राम बिराजदार, सचिव नागेश बडदाळ, सचिव संजय साखरे, सहकोषाध्यक्ष विजय बिराजदार, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!