शिक्षकांनी जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाला म्हणून थांबू नये, राज्य पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत – अविनाश बागवे
अक्कलकोट : शिक्षक हे चांगले संस्कारक्षम पिढी घडवून देश घडविण्याचे कार्य करतात. त्यांचा उचित गौरव करणे हे महान कार्य आहे. शिक्षकांनी जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाला म्हणून थांबू नये, त्याच्या पुढे जाऊन राज्य पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत. वसंत देडे हे रंगकाम करुन उदरनिर्वाह चालवित असले तरी मनाची श्रीमंती त्यांची मोठी आहे असे गौरवोद्गार पुणे महानरगपालिकेचे नगरसेवक, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे सुपूत्र अविनाश बागवे यांनी केले.
मातंग एकता आंदोलन जिल्हा कार्याध्यक्ष वसंत देडे यांच्यावतीने जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक व जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बागवे बोलत होते.
व्यासपीठावर विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, रामभाऊ वाघमारे, डॉ.शिवाजी शिंदे, उद्योगपती चंद्रकांत कलशेट्टी, मुन्ना राठोेड, बोरगावचे सरपंच विलास सुरवसे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मनोज निकम, ऋषिकेश कसबे, आनंद कांबळे, मातंग एकता आंदोलन जिल्हा कार्याध्यक्ष वसंत देडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
देशासाठी झटणार्या शिक्षकांचे गौरव करणे यामध्ये मला मोठा आनंद मिळतो. चांगले कार्य करणार्यांना कौतुकाची पाठीवर थाप मारणे, त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यामुळे आर्थिक स्थिती नसतानाही स्वत:च्या खिशाला झळ सोसून हे कार्य करीत असल्याचे मनोगतामध्ये व प्रास्ताविकात मातंग एकता आंदोलन जिल्हा कार्याध्यक्ष वसंत देडे यांनी केले.
प्रमुख अतिथी व पुरस्कार वितरण सोहळ्यास संबांधित करताना प्रा.शिवाजी शिंदे म्हणाले की, वसंत देडे हे मोठ्या तळमळीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आदर्श शिक्षक व आदर्श पत्रकार रुपी हिरे निवडलेले आहेत. त्यांचे कार्य दिपस्तंभासारखे आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून वसंत देडे यांनी करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. ते आर्थिकदृष्टीने गरीब असले तरी मनाने फार मोठे श्रीमंत आहेत, असे गौरवोद्गार या पुरस्कार वितरण प्रसंगी काढले.
या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी प्रा.शंकर धडके, प्रा.धानय्या कवटगीमठ, प्रविण घाटगे, सैदप्पा इंगळे, इस्माईल जमादार, महिबूब सवार, दीपक पोतदार, योगेश बारस्कर, डॉ.सतिश बिराजदार, सागर मलभावे, रमेश उमाटे, प्रा.जगताप आदीजण उपस्थित होते.
यांचा झाला गौरव :
आदर्श जिल्हास्तरीय पत्रकार सेवा पुरस्कार : उपसंपादक भरतकुमार मोरे, रवि ढोबळे. आदर्श जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार : प्रा.प्रकाश सुरवसे, प्रा.कुलदिप देशमुख, प्रा. विनायक कलुबर्मे, शिवाजी भागंरे, बालाजी हादवे, समीना म.इसाक शेख, श्रीमती सुवर्णा बोरगावकर, श्रीमती सुनिता किरनळ्ळी, सुजाता जुगदार, सुनिता निकम, दिवाकर काबंळे, अरूण काळे, परमेश्वर भालेकर, शिवशरण धानशेट्टी.