ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिर्डी, पंढरपूरला देव दर्शनासाठी जाताय…अगोदर ही बातमी वाचा, मग जा!

मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर बंद असलेली देशभरातील अनेक धार्मिक स्थळे गेल्या ५ ते ६ महिन्यानंतर सुरु करण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिले जात आहे. दरम्यान, शिर्डी आणि पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय संस्थानांनी घेतला आहे. साईभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.  साईबाबांच दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन पास असणं अत्यंत गरजेचं आहे. तर पंढरपूर विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकींग पास सक्ती नाही.

दर्शनासाठी ऑनलाईन पास आवश्यक 

शिर्डीत गुरुवार,शनिवार आणि रविवारी दिवस फक्त ऑनलाईन पास धारकांना दर्शन देण्यात आले येणार आहे. . तसेच दर्शनासाठी ऑनलाईन पास आवश्यक आहे. भाविकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी संस्थानने हा निर्णय घेण्यात आला आगे. गर्दी नियंत्रणासाठी ३ दिवस पास वितरण केंद्र बंद ठेवणार  शिर्डीत गुरुवारी, शनिवारी, रविवारी तसंच सुट्ट्या आणि सणांच्या दिवशी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे या दिवशी केवळ ऑनलाईन पासेस असलेल्यांनाच साईदर्शन दिलं जाणार आहे. शिर्डीतील पास वितरण केंद्रे गर्दी नियंत्रण करण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दर दिवशी ८००० भाविकांना मुखदर्शन

तसेच पंढरपूर विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकींग पासकरता सक्ती नाही. २० जानेवारीपासून ओळखपत्र दाखवून दर्शन मिळणार आहे. त्यामुळे आता दर दिवशी ८००० भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे.

महत्वाचं म्हणजे मकर संक्रांतीला महिलांना ओवसायला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या दिवशी दर्शन सुरूच राहणार आहे. कोरोना नियमानुसार दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील भाविकांना प्रवेश नाही, अशी माहिती मंदिर समिती सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!