ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांचे शिवसेनेने अवमूल्यन केले ; प्रविण दरेकर

मुंबई : शिवसेनेच्या ज्या महिला आघाडीने शिवसेनेचे जीवापाड  काम केले, रस्त्यावर उतरुन शिवसेनेसाठी लाठया काठ्या खाल्या. त्यामुळे  शिवसेनाप्रमुखांनी महिला आघाडीचा सन्मान केला होता. पण उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांचे शिवसेनेने एका अर्थाने अवमूल्यन केल्याची टिका विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दल बोलताना दरेकर म्हणाले की, पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु प्रवेश देताना उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशाने महिला आघाडी मजबूत होईल असे वक्तव्य करणे म्हणजे आदरणीय बाळासाहेबांनी रणरागिणी म्हणून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना जी उपमा दिली व घरा दाराची पर्वा न करता शिवसेनेच्या वाढीसाठी लढवय्या कार्यकर्ता म्हणून काम केले त्यांच्या कामावर हा पाणी फेरण्याचा प्रकार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच बदलते स्वरूप दिसून येत आहे. प्रियांका चतुर्वेदी यांना खासदार केले. ज्या राज्यातील सत्तेत काँग्रेस आहे त्या काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवेलेल्या उमेदवाराने आज शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगताना दरेकर म्हणाले की, पक्षाची मूळ विचारधारा बाजूला ठेऊन शिवेसनेचे राजकारण काँग्रेस व राष्ट्रवादी  बरोबर जाऊन केवळ सत्तेच्या समीकरणाभोवती फिरताना दिसत आहे .

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जीवापाड  काम केले. उदा.मीना कांबळी,उमेशा पवार,सुधाताई चुरी यांनी शिवसेनेसाठी रस्त्यावर उतरुन काम केले. त्यांच्या या कामाचा शिवसेनाप्रमुखांनी सन्मान केला होता. परंतु आता उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांचे शिवसेनेने एका अर्थाने अवमूल्यन केल्याचेही दरकेर यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!