ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांची मालमत्ता ‘ईडी’ने केली जप्त

मुंबई | पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई करताना शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर राऊत यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.

 

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात समन्स बजावले होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले होते.

 

पीएमसी बँकेतील ४ हजार ३०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडी मार्फत तपास सुरू आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. पीएमसी बँकेचे ९० कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. त्यात प्रवीण राऊत व त्यांची पत्नी माधुरी राऊत यांची चौकशी करण्यात आली आहे व त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!