अक्कलकोट, दि.२६: अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणात शनिवारी सकाळी 65 टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती बोरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या आठ दिवसापासून बोरी आणि हरणा नदी लाभक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे.त्यामुळे या दोन्ही नदी वाटे पाण्याचा प्रवाह अद्याप सुरू आहे.हरणा नदीवाटे पाण्याचा प्रवाह जास्त असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.यामुळे धरणामध्ये शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत 65 टक्के पाणी साठा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावर्षी धरण उशिरा भरत आहे. परतीचा पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे धरण भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.कारण मागच्या पंधरा दिवसात 40 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. हे धरण भरल्यास अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.