अक्कलकोट,दि.३० : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग भागात झालेल्या दमदार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे.बुधवारी हे धरण ८५ टक्के
भरले होते.बोरी नदीचा पाण्याचा विसर्ग अद्याप कायम आहे तर हरदा नदीचा प्रवाह थोडा कमी झाला आहे.नळदुर्ग येथील नर मादी धबधबा सुरु झाल्याने धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे.पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या धरणामध्ये ६८० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.पाण्याचा फ्लो असाच कायम राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसात कुरनूर धरण शंभर भरण्याची आशा निर्माण झाली आहे.सध्या परतीचा पाऊस सुरू आहे.
अशा परिस्थितीत धरण भरेल ,असा विश्वास प्रशासनाने वर्तवला आहे. कुरनूर धरण भरल्यास अक्कलकोट शहराचा पाण्याचा प्रश्न तसेच तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे.