ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सरपंचपदासाठी आरक्षण सोडत महिनाभरातच, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदांचे आरक्षण जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दुपारी दिली. पुढील एक महिन्यात ही आरक्षण सोडत काढली जाईल, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. मात्र आरक्षण सोडत बाकी असल्याने बहुमत मिळूनही ग्रामपंचायत ताब्यात आली याची अनेकांना श्वाश्वती नाही. त्यामुळे विजयी उमेदवारांची धाकधूक कायम आहे.

११ डिसेंबर रोजी सरपंचपदांच्या आरक्षण सोडती निवडणूक निकालानंतर काढाव्यात, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले होते. मात्र तत्पूर्वी काही जिल्ह्यांत आरक्षण सोडती झाल्या होत्या. त्या रद्द करण्यात आल्या अाहेत. निवडणुकीच्या अगोदर सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच कोरोनाचे कारण पुढे करून आरक्षण सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय घेतला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!