---Advertisement---

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

On: January 19, 2021 2:19 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई :  भारताने चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या जोरदार विजयाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे. गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील असे त्यांनी म्हटले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील  भारतीय संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्द याच्या जोरावर संपूर्ण कसोटी मालिका जिंकली. धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय संघानं या मालिकेत नवीन विक्रम प्रस्थापीत केला ही देशातील सर्व क्रिकेटवीरांसाठी अभिमानाची बाब आहे असेही मुख्यमंत्री म्हणतात.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!