नवी दिल्ली । आज सलग दुसर्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये लिटरमागे २४ ते २५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर ९२ रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत, तर डिझेलच्या दराने नवीन उच्चांक गाठला आहे.
सरकारी इंधन कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री दरांमध्ये प्रतिलिटर २४ ते २५ पैशांनी वाढ केली आहे. या सप्ताहात याआधी १८ आणि १९ रोजी या दोन्ही इंधनांच्या दरामध्ये प्रतिलिटर २५ पैशांनी वाढ केली गेली होती. याचाच अर्थ या सप्ताहामध्ये इंधनाच्या दरांमध्ये लिटरमागे १ रुपयाने वाढ झाली आहे.
या दरवाढीमुळे डिझेलच्या किमती आता उच्चांकी गेल्या आहेत. तसेच मुंबईमध्ये आता पेट्रोलचे दर ९२.२८ रुपये असे झाले आहेत.तर डीझेल ८२.६६ प्रती लिटरवर गेले आहे. सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या किमतींमुळे सरकारने इंधनावरील अबकारी करामध्ये कपात करण्याची मागणी होत आहे.
दिल्लीत पेट्रोल 85.70 रुपये तर डिझेल 75.88 रुपये प्रतिलिटर आहे. मुंबईत पेट्रोल 92.28 रुपये तर डिझेल 82.66 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 87.11 रुपये आणि डिझेल 79.48 रुपये प्रति लिटर आहे.