---Advertisement---

देशात पुन्हा एकदा नोटबंदी? आरबीआयकडून ‘या’ नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरु

On: January 23, 2021 12:19 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता  ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा मार्च किंवा एप्रिलपर्यंत बाजारातून काढून घेण्याचा विचार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत आहे. याबाबत आरबीआयचे असिस्टंट जनरल मॅनेजर बी महेश यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याची त्यांनी माहिती दिली. ते जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बोलत होते.

तसेच ‘१० रुपयांच्या नाण्याला अद्यापही व्यापारी तसेच उद्योजकांकडून स्वीकारले गेले नसल्यावरुन बी महेश यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “१० रुपयांचं नाणं आणून १५ वर्ष झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणं बँका आणि आरबीआयसाठी मोठी समस्या झाली आहे.

 

दरम्यान, २०१९ मध्ये आरबीआयने १०० रुपयांची नवी जांभळ्या रंगातील नोट आणली होती. याबाबत बोलताना बी महेश यांनी १०० च्या नव्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!