ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सिनेमागृहे आणि नाटयगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक

 

मुंबई दि. 1: जवळपास सहा महिन्यांपासून आज राज्यातील सिनेमागृहे/नाटयगृहे बंद असली तरी येणाऱ्या काळात सिनेमागृहे/नाटयगृहे सुरु करताना नागरिकांची सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. लॉकडाऊननंतर सिनेमागृहे उघडताना सिनेमागृहात प्रेक्षक येण्यासाठी हा काळ महत्वाचा आहे. राज्यातील सिनेमागृहे आणि नाटयगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी उपस्थित थिएटस ओनर्सना चर्चेदरम्यान सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मल्टिप्लेक्स स्क्रिन ओनर्स आणि सिंगल स्क्रीन ओनर्स, थिएटर ओनर्स, फिल्म स्टुडिओ ओनर्स असोसिएशन समवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनिषा वर्मा, सह व्यवस्थापकीय संचालिका आंचल गोयल, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन,थिएटर आणि फिल्म स्टुडिओचे ओनर्स उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!