मुंबई : कोरोनाच्या नव्या प्रजातीने ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातला असून युरोपवर लॉकडाउनचे संकट घोंघावत आहे. यामुळे मागील दोन सत्रात गुतवणूकदारांनी सोने आणि चांदीला प्राधान्य दिले आहे. दरम्यान, आज सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे.
सध्या कमॉडिटी बाजारात सोने १८० रुपयांनी तर चांदी १००० रुपयांची घसरण झाली आहे. आज सकाळपासून बाजारात नफावसुलीचा दबाव आहे. सोन्याने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदी देखील ७० हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. मात्र गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने तेजीला वेसण बसले आहे.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०१९६ रुपये आहे. त्यात १७७ रुपयांची घसरण झाली आहे. सोमवारी सोने २३० रुपयांनी महागले होते. तत्पूर्वी दिवसभरात सोने ५०५४० रुपयांवर गेले होते. एक किलो चांदीचा भाव ६७८३० रुपये आहे. त्यात ११८८ रुपयांची घसरण झाली आहे. सोमवारी चांदीचा भाव ७१६५० रुपयांपर्यंत वाढला होता.
good returns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९३८० रुपये आहे. त्यात ६५० रुपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट चा भाव ५०३८० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९२६० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५३७३० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४७४७० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५१७८० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४४० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२१४० रुपये आहे.