ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोने-चांदीच्या भावात पुन्हा घसरण ; जाणून घ्या आजचा नवीन दर

मुंबई । दोन सत्रात तेजीत आलेल्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९१६२ रुपये आहे. त्यात ९८ रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी दिवसभरात सोने २३० रुपयांची घसरण झाली आणि सोने ४८९३५ रुपयांपर्यंत खाली आले होते. सध्या चांदीचा एक किलोचा भाव ६३३८० रुपये आहे. १३७ रुपयांची घसरण झाली आहे.

 

सोन्याचे नवीन दर

goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३०० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ४९२५० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४८०५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२४२० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ४८८०० रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचा भाव ५१५०० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४६२२० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५०४२० रुपये आहे.

 

चांदीचे नवीन दर

चांदीमध्ये सोमवारी प्रति किलो 16 रुपयांची किंचित घट नोंदली गेली. आता चांदीचा नवीन दर 62,734 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. पहिल्या व्यापार सत्रात चांदी 62,750 रुपयांवर होती. आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर आजही चांदीची किंमत प्रति औंस 23.92 डॉलर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!