सोलापूरः केंद्र सरकारच्या नव्या कायद्याविरोधात आज देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंद ची हाक दिली आहे. देशभरात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल आहे. दरम्यान, सोलापूर येथे या कायद्याच्या विरोधात आज रिपब्लिन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष अशफाक शेख, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष इकबाल शेख, इसाक डोका, डी. डी. पांढरे, गौस पिरजादे, अकबर शेख, बंटी उबाळे, यासीन बागवान, साद बागवान, सद्दाम नदाफ, एजाज शेख, रफीक शेख, सलीम शेख, मुजाहीद लष्करवाले, शहनाज मुजावर, सायरा बानो, सुनिता बोकडे, लैला जमादार, कविता जठाडे,व पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.