---Advertisement---

सोलापुरात विधानपरिषदेसाठी भाजपची बैठक, उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर दि १८: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्राम संपतराव देशमुख आणि जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आज भाजपा सोलापूर शहर पदाधिकार्‍यांची बैठक सोलापूर येथील शिवस्मारक सभागृहात घेण्यात आली.

संग्रामसिंह देशमुख आणि जितेंद्र पवार यांना सोलापूर शहर व जिल्ह्यातून चांगले मताधिक्क्य मिळवून देत निवडून आणू असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

या बैठकीत पदवीधर उमेदवार संग्राम देशमुख,शिक्षक मतदारसंघाचे जितेंद्र पवार,आमदार विजयकुमार देशमुख ,माजी सहकार मंत्री-सुभाष बापू देशमुख, खासदार-जयसिध्देश्र्वर महाराज, शहर अध्यक्ष-विक्रम देशमुख ,जिल्हा अध्यक्ष-श्रीकांत देशमुख,महापौर श्रीकांचना यन्नम,शहर सरचिटणीस बिज्जु प्रधाने,शहर संघटन सरचिटणीस-रुद्रेश बोरामणी,सरचिटणीस-शशि थोरात,परिवहन सभापती जय साळुंखे यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!