ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूरात विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या लेखणी बंद आंदोलनाला आमदार सचिन कल्याणशेट्टींचा पाठिंबा

 

सोलापूर, दि.२९ : राज्यातील सर्व विद्यापीठ कर्मचाऱ्यांना लागू केलेला सातवा वेतन आयोग विद्यापीठ कर्मचाऱ्यांना अद्यापही लागू न झाल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटनांच्या संयुक्तरित्या ७ वा वेतन आयोग, आश्वासीत प्रगती योजना व इतर न्याय मागण्यासाठी दि. २४ सप्टेंबरपासून लेखणी बंद/ ठीया आंदोलन पुकारण्यात आले.सर्व अधिकारी, कर्मचारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने लेखणीबंदच्या सहाव्या दिवशीही 100 टक्के कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.
कर्मचार्‍यांच्या या आंदोलना मुळे विद्यापीठाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
राज्यातील सर्वच विद्यापिठात ७ वा वेतन व इतर मागण्यासाठी आंदोलने सुरु असुन या आंदोलना बाबतचे निवेदन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना देण्यात आले. पवार हे आज पंढरपूर दौर्‍यावर आले असता महाविद्यालयीन व विद्यापीठ संघटनेकडून शरद पवारांना या आंदोलनाची माहिती देण्यात आली.तसेच सदर आंदोलनास अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भेट देवुन पाठींबा जाहिर केला. याप्रश्नी स्वत: मंत्री उदय सामंत यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. या आंदोलनास विद्यापीठ कॅम्पस टिचरने ही पाठिंबा दिला . यावेळी टिचर असो. अध्यक्ष डाॅ विकास पाटील, विकास घुटे, डाॅ. गौतम कांबळे, डाॅ रघुनाथ भोसले, डाॅ. माया पाटील, डाॅ. अंजना लावंड, हे उपस्थित होते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना अध्यक्ष गजानन काशिद, श्रीमती रुपाली हुंडेकरी, देवकन्या पांढरे, मंगल कटके, सुप्रिया अनभुले , श्रीमती. कलादगी, अंजली साखरे, रेखा कस्तुरे, संतोष उमदी, हुळ्ळे, महादेव वलेकर, इंद्रजित तळभोगे, लक्ष्मण चिक्का, पंकज व्हनमाने, विजय चौगुले, विजय जाधव, मारुती कोळी, उत्तम राक्षे, अजय बंडगर, वडवराव, हणमंत लोखंडे, शिवराज मिटकरी केजरीवाल ,दिलीप हाके, भिमा येणगुरे, प्रमोद देवेकर, हणमंते,अनिल जाधव, अमोल खंडागळे,प्रकाश जावळे, यांच्यासह सर्वच कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!