ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर : नीट परीक्षेत संगमेश्वरमधून साक्षी हेडगिरे,चैत्राली कुलकर्णी प्रथम

सोलापूर,दि.१७ : नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यामार्फत सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या नीट राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय पात्रता पूर्वपरीक्षेत भारतातून 14 लाख 37 हजार विद्यार्थी बसले होते.यामध्ये संगमेश्‍वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले .साक्षी हेडगीरे 565, चैत्राली कुलकर्णी 565, शिवकुमार उपासे 549 , ऋषिकेश होनमाने 534 या विद्यार्थ्यांनी पाचशेहून अधिक गुण घेऊन महाविद्यालयात अव्वल येण्याचा मान मिळवला. पात्रताधारक विद्यार्थी
रोहित काकडे 405, छाया शिंदे 396, ओम पाटील 391, प्राजक्ता कांबळे 384 ,प्रतीक्षा पाटील 376, श्वेता पवार 355,आदित्य निकम 347, अंजली निंबर्गी 343 ,आदित्य निंबाळकर 339 ,सचिन सिलिंग 316
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून बोलताना जयराज हेडगिरे यांनी संगमेश्वर महाविद्यालयाच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे ऋण व्यक्त केले . याप्रसंगी यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय कॉलेज आणि आपल्या शिक्षकांना दिले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी , प्राचार्य डॉ. शोभा राजमान्य ,उपप्राचार्य आनंद हुली, लॉजिक इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. अनिल देवकर , पर्यवेक्षक प्रसाद कुंटे, यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी विज्ञान विभाग प्रमुख प्रा. प्रमोद उडगिकर,प्रा. रामराव राठोड, प्रा. रवी कट्टी,भाषा समन्वयक प्रा. शिवराज पाटील प्रा. सुषमा पाटील, प्रा. लीना खमितकर ,प्रा.प्रशांत शिंपी ,प्रा.नागेश कोल्हे ,प्रा.विशाल जत्ती, समन्वय डॉ. गणेश मुडेगावकर, प्रा. रोहन डोंगरे प्रा. संतोष पवार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!