सोलापूर : सोलापूर शहरात आज शनिवारी कोरोनाचे नवे 37 रुग्ण आढळून आले आहे. तर आज ४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 24 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे.
आज मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 743 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 706 निगेटीव्ह आहेत. तर ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात
जुळे सोलापूर, दमाणी नगर, शेटे नगर (लक्ष्मी पेठ), शिवाजी नगर (मोदीखाना) व बुधवार पेठेत प्रत्येकी दोन रुग्ण तर आंबेडकर नगर (गुरुनानक चौक) येथे तीन पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील रुग्णसंख्या आता दहा हजार 335 झाली असून त्यातील नऊ हजार 336 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरात आज जुनी मिल चाळ, चिंतनवार वस्ती (मोदीखाना), रामलिंग नगर (विजयपूर रोड), लक्ष्मी नगर (देगाव), रेणुका नगर, वामन नगर (जुळे सोलापूर), एसआरपी कॅम्प, आरटीओ कार्यालयाजवळ, हुनमान नगर (भवानी पेठ), मनपा कॉलनी (सात रस्ता) आणि अवंती नगर (मुरारजी पेठ) येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. ऍक्टिव्ह रुग्णांच्या संपर्कातील एकूण 105 संशयित होम क्वारंटाईन आहेत. तर 50 संशयित इन्स्टिट्यशूनल क्वारंटाईन असून 44 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
आतापर्यंत शहरातील पाच हजार 476 पुरुषांनी तर तीन हजार 860 महिलांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील मृतांची संख्या 561 असून मागील दोन दिवसांत एकाही रुग्ण कोरोनामुळे दगावलेला नाही. दरम्यान, आतापर्यंत शहरातील सहा हजार 120 पुरुष आणि चार हजार 215 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे.